अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या जळगाव जिल्ह्यात तीन घटना उघडकीस

On: March 18, 2023 7:57 AM

जळगाव : दहावीच्या पेपरला जाण्यासाठी मुलीला रिक्षात बसवल्यानंतर ती बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याघटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेसह अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याबाबत तीन घटना उघडकीस आल्या आहेत. एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल घटनेतील मुलीचा दहावीचा पेपर होता. त्या पेपरला जाण्यासाठी तिला तिच्या वडीलांनी हॉटेल कस्तुरी तेथून रिक्षात बसवले. त्यानंतर ती बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले. पोलिस उप निरीक्षक दीपक जगदाळे पुढील तपास करत आहेत.

दुस-या घटनेत यावल तालुक्यातील किनगाव येथील मुलगी बेपत्ता झाली आहे. लोकांच्या घरी धुणी भांडी करण्यास जात असल्याचे सांगून गेलेली मुलगी बेपत्ता झाल्याचे उघड झाले. ती ज्यांच्याकडे धुणी भांडी करण्यास जाणार होती त्यांच्याकडे ती मुलगी गेलीच नसल्याचे पालकांनी केलेल्या तपासणीत उघड झाले. याप्रकरणी यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.कॉंस्टेबल रविंद्र पाटील करत आहेत. तिस-या घटनेत भडगाव येथील मुलगी बेपत्ता झाली आहे. कुणीतरी पळवून नेल्याप्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत बाळद रस्त्यावरील एका इलेक्ट्रिक दुकानावरून मुलगी बेपत्ता झाली. सहायक फौजदार छबुलाल नागरे या घटनेचा तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment