तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

जळगाव : पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथील तरुणाचा एरंडोल तालुक्यातील भातखंडे – उत्राण परिसरात धारदार शस्त्राने हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एरंडोल आणि पाचोरा तालुक्यात खळबळ माजली आहे. अमोल उर्फ सोनू देवीदास पाटील असे या घटनेतील मयत तरुणाचे नाव आहे.

आज सकाळी या हत्येची वार्ता परिसरात पसरली. या हत्येची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी वाळू व्यवसायातील स्पर्धेतून ही हत्या झाल्याचे म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here