अट्टल गुन्हेगाराकडून 14 मोटार सायकली जप्त

On: March 19, 2023 9:35 PM

जळगाव : अट्टल मोटार सायकल चोरट्याकडून 14 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अजय अंबालाल पावरा असे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईत अटकेतील गुन्हेगाराचे नाव आहे. अमळनेर पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. अमळनेर शहरासह मध्य प्रदेशातून मोटार सायकली चोरल्याचे अटकेतील अजय पावरा याने कबुल केले आहे. त्याला अमळनेर येथून अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील अधिनस्त पोलीस अंमलदार स.फौ. रवि नरवाडे, पोहेकॉ राजेश मेंढे, पोहेकॉ संजय हिवरकर, पोहेकॉ गोरख बागुल, पोहेकॉ कमलाकर बागुल, हेड कॉन्स्टेबल संदिप पाटील, पोहेकॉ संदिप साळवे, पोना प्रविण मांडोळे, पोना ईश्वर पाटील, पोकॉ लोकेश माळी, चापोकॉ. अशोक पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. पुढील तपासकामी अजय पावरा यास अमळनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment