नागपुर : एकाच कुटूंबातील चौघांनी केलेल्या सामुहिक आत्महत्येने उप राजधानी असलेल्या नागपुरात खळबळ माजली आहे. पती, पत्नी सह दोघा मुलांनी ही आत्महत्या केली आहे.
कोराडी रोड ओमनगर येथील राणे परिवाराने हा आत्महत्येचा पर्याय का स्विकारला याचा उलगडा होवू शकला नाही. धिरज राणे हे प्राध्यापक तर त्यांची पत्नी सुषमा राणे या व्यवसायाने डॉक्टर होत्या. त्यांना 11 वर्षाचा धृव नावाचा तर 5 वर्षाची लावण्या नावाची मुलगी होती. या आत्महत्येप्रकरणी राणे परिवाराने सुसाईड नोट लिहून ठेवली होती का? याचा पोलिस शोध घेत असून पुढील तपास सुरु आहे.