तरुणाचा खून – ओळख पटवण्याचे आवाहन

On: March 21, 2023 7:38 PM

जळगाव : जळगाव नजीक पहुर – जामनेर रस्त्यावर एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. कोणत्यातरी धारदार शस्त्राने या अनोळखी तरुणाची हत्या झाल्याचे उघड झाले असून या तरुणाची ओळख पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेमुळे पहुर आणि जामनेर परिसरात खळबळ माजली आहे.

आज सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास या घटनेची माहिती मिळताच पहुर पोलिसांचे पथक घटनास्थळावर हजर झाले असून पुढील कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. कुणीतरी या तरुणाची हत्या करून मृतदेह याठिकाणी आणून टाकला असावा अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमागे अनैतिक कारण असू शकते अशी देखील परिसरात चर्चा सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment