कोंबिंग ऑपरेशन दरम्यान मिळाला हद्दपार आरोपी

On: March 21, 2023 10:22 PM

जळगाव : जळगाव शहरात कोंबिंग ऑपरेशन दरम्यान मिळून आलेल्या हद्दपार आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. शाहरुख जहूर खाटीक असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या हद्दपार आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान तो मिळून आला आहे.

शाहरुख खाटीक याच्याविरुद्ध नऊ गुन्हे दाखल असल्याने त्याला जळगाव शहरातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र तो बेकायदा जळगाव शहरात वास्तवी करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. जयापाल हिरे यांच्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक सचिन पाटील, पो.कॉन्स्टेबल साईनाथ मुंढे, सतिष गरजे, चंद्रकांत पाटील, होमगार्ड किरण जोशी, पंकज सापकर आदींनी या कारवाई सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment