ट्रक थांबवून लुटमार करणारी टोळी ताब्यात

On: March 22, 2023 7:11 PM

जळगाव : ट्रक थांबवून लुटमार करणा-या पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने अटक केली आहे. या टोळीतील सदस्यांनी आपला गुन्हा कबुल केल्याने चोपडा शहर पोलिस स्टेशनला दाखल गुन्हा उघडकीस आला आहे.

नवाबखान गुलाबखान (रा. शिवाजी नगर जळगाव), शाहरुख खान शाबीर खान (रा.गेंदालाल मिल जळगाव), सौरभ भुवनेश्वर लांजेवार (रा.रायपुर छत्तीसगड), जावेद खान नासीरखान (रा.गेंदालाल मिल जळगाव), प्रदिप राधेश्याम रायपुरीया (रा.गेंदलाल मिल जळगाव मुळ राहणार सेआमपुरा,ता.लाहार जि.भिंड मध्य प्रदेश) अशी जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातून अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील हे.कॉन्स्टेबल विजयसिंग पाटील,अकरम शेख,महेश महाजन, पोना परेश महाजन,रविंद्र पाटील, अविनाश देवरे, दिपक शिंदे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment