पाच हजाराची लाच – तलाठी – कोतवाल एसीबीच्या सापळ्यात

जळगाव : तलाठ्याच्या सहमतीने कोतवालाने घेतलेल्या पाच हजाराच्या लाचप्रकरणी दोघांची जोडी एसीबीच्या सापळ्यात अडकली आहे. भरमसाठ पगार आणि तरीही पेंशनची मागणी करणा-या महसुल कर्मचा-यांची पैशांची भुक अद्याप शमलेली नाही असे या घटनेच्या माध्यमातून जनतेत खुलेआम बोलले जात आहे.  ज्ञानेश्वर सुर्यभान काळे (मौजे बोरखेडा बु॥,तलाठी कार्यालय, ता.चाळीसगाव) असे तलाठ्याचे आणि किशोर गुलाबराव चव्हाण असे कोतवलाचे नाव आहे. सुरुवातीला सात हजार नंतर तडजोडीअंती पाच हजाराची लाच मागण्यात आली होती. 9 मार्च रोजी मागण्यात आलेली लाच 23 मार्च रोजी स्विकारण्यात आली.

या घटनेतील तक्रारदाराच्या वडीलांनी त्यांची शेतजमीन त्यांनी केलेल्या मृत्यूपत्रानुसार  बोरखेडा बु॥ येथील तक्रारदाराच्या नावे केली आहे. तक्रारदाराच्या हिश्यावर एकुण ३ गट वाटणीस आलेले आहेत. या ३ गटांपैकी ६४/२ ही शेतजमीन तक्रारदाराची पत्नी प्रतिभा पाटील यांच्या नावे करायची आहे. नोव्हेंबर-२०२१ मध्ये तलाठी ज्ञानेश्वर काळे यांनी सांगितल्याप्रमाणे तक्रारदाराने हे प्रकरण सादर केले आहे. तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे शेती करण्यासाठी तलाठी ज्ञानेश्वर काळे यांनी यापुर्वी देखील तक्रारदाराडून एकुण सात हजर रुपये घेतले आहे. तरी देखील तलाठी काळे यांनी काम केले नाही. त्यामुळे तक्रारदार तलाठी काळे यांना त्यांच्या कार्यालयात जावून भेटले.

काम करण्यासाठी नव्याने सात हजार रुपयांची मागणी तलाठी काळे यांच्या वतीने कोतवाल किशोर चव्हाण यांनी तक्रारदाराकडे केली. तडजोडीअंती पाच हजार रुपये देण्या – घेण्याचे ठरले. लाचेची पाच हजार रुपयांची रक्कम स्वत: तलाठी काळे यांनी पंचासमक्ष घेतांना एसीबी पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलिस उप अधिक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, पो.नि. संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे. पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here