दुकानदारास मारहाण करुन मोबाईलसह हिसकावली बॅग

On: March 24, 2023 7:14 PM

जळगाव : संगणक दुरुस्तीचे काम करणा-या दुकानदारास रिक्षातून आलेल्या तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याच्याकडील मोबाईल आणि संगणक दुरुस्तीच्या सामानासह असलेली बॅग हिसकावून पलायन केल्याच्या घटने प्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केजाद नवरोज जलगाववाला असे गोलाणी मार्केट मधील जखमी दुकानदाराचे नाव आहे.

23 मार्च रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास केजाद जलगाववाला हा तरुण आपल्या दुकानात संगणकाचे सामान ठेवण्यासाठी गेला होता. त्यावेळी रिक्षाने आलेल्या तिघांपैकी एकाने त्याला पैसे मागितले. आपल्याकडे केवळ दहा रुपये असल्यचे त्याने तिघांना सांगितले. पुढच्याच क्षणी एकाने त्याच्या खिशात हात घालून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. केजाद याच्या खिशात पैसे नसल्यामुळे तिघांनी त्याच्या खिशातील मोबाईल हिसकावून घेतला. याशिवाय दुस-याने त्याची मान धरुन ठेवत बॅग हिसकावून घेतली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात त्याचा डोळा सुजला. ज्या रिक्षाने तिघे आले त्याच रिक्षाचे चाक त्याच्या पायावरुन नेल्याने त्याचा पंजा सुजला. 53 हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेण्यासह मारहाण करुन पळून जाणा-या तिघांविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment