शाळकरी मुलीवर अत्याचार- नाशिक उपनगरला गुन्हा दाखल

On: August 18, 2020 10:24 PM

नाशिकरोड : देवळाली गावातील अल्पवयीन विद्यार्थीनी सहा महिन्यापूर्वी सायकलवरुन घरी येत होती. त्यावेळी अज्ञात इसमाने तिला धडक देत तिला खाली पाडले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला होता. तिला त्रास असह्य झाल्याने तिच्यावरील अत्याचाराला वाचा फुटली.

या प्रकरणी नाशीक उपनगर पोलिसात पोक्सो कायद्यानुसार अज्ञाताविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचारानंतर पिडीत विद्यार्थिनी बेशुद्ध पडल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पलायन केले होते. शुद्धीवर आल्यानंतर तिने कसेबसे घर गाठले होते. आपले आईवडील शिक्षण बंद करतील या भितीने तिने हा प्रकार कुणाला सांगितला नव्हता. काही दिवसांनी ती घरी एकटी असतांना त्या नराधमाने तिच्या घरी येवून तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला.

पिडीत मुलगी मामाच्या घरी गेल्यानंतर तिला त्रास होवू लागला. तिची वैद्यकीय तपासणी केली असता ती गरोदर असल्याचा प्रकार पुढे आला. तिने सर्व घटनाक्रम पालकांना कथन केला. त्यामुळे तिला औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नाशिक उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment