जळगाव : जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमधे 26 मार्चच्या रात्री तरुणाच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांच्या पथकाने अवघ्या चार तासात या गुन्ह्याचा उलगडा लावला आहे. जळगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतील गोलाणी मार्केटमधे 26 मार्चच्या रात्री साडेनऊ वाजेच्यासुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. सोपान गोविंदा हटकर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव निष्पन्न झाले आहे. या घटने प्रकरणी मयत सोपान हटकर याच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव शहर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 77/23 भा.द.वि. 302, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर उर्फ नानू दयाराम लोंढे, रा. कंजरवाडा जळगाव, राहुल भरत भट, रा. खोटे नगर जळगाव, गोविंद उर्फ चेरी शांतीलाल झांबरे, रा. कंजरवाडा जळगाव, करण सुभाष सकट रा. कोंडवाडा बी. जे. मार्केट जळगाव अशी अटक करण्यात आलेल्या चौघा संशयीतांची नावे आहेत. मयताची मोटार सायकल चौघा मित्रांनी वापरण्यास घेतली होती. ती परत देण्यासाठी चौघांनी मयत सोपान हटकर यास गोलाणी मार्केट परिसरात बोलावले होते. त्यावेळी दारु पिवून आलेल्या सोपान हटकर याने चोघांना शिवीगाळ सुरु केली. यावेळी संतापाच्या भरात चौघांनी त्याला चॉपरने ठार केल्याचे अटकेतील चौघांनी कबुल केले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरी गणेश चोबे, अमोल देवढे, पोहेकॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, राजेश मेंढे, संजय हिवरकर, कमलाकर बागुल, अशरफ शेख, संदिप पाटील, महेश महाजन, अकरम शेख, संदिप सावळे, पोना संतोष मायकल, विजय पाटील, प्रविण मांडोळे, दर्शन ढाकणे, पोकॉ. ईश्वर पाटील, लोकेश माळी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.