जळगाव : मुलीच्या लग्नात आमंत्रण दिले नसल्याचा राग आल्याने तिघांनी वधू पित्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दुखापत केल्याप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुंदरनगर तांडा या ठिकाणी 26 मार्च रोजी लग्न आटोपल्यानंतर ही घटना घडली होती.
सुंदरनगर तांडा याठिकाणी असलेल्या लग्नात आपल्याला का बोलावले नाही याचा राग आल्याने देवीदास हरदास राठोड, मोहनदास हरदास राठोड, शिवदास हरदास राठोड या तिघांनी वधूपित्यासह त्याच्या परिवाराला वाद घालुन शिवीगाळ करत मारहाण केली होती. तुम्ही गावात कसे राहता, तुम्हाला बघतो अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक प्रकाश कोळी करत आहेत.