एमपीडीए कायद्याअंतर्गत जळगावचे दोघे स्थानबद्ध

On: March 28, 2023 7:47 PM

जळगाव : एमपीडीए कायद्याअंतर्गत जळगाव येथील दोघा गुन्हेगार तरुणांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. रिजवान उर्फ काल्या गयासोद्दीन शेख (रा. अजमेरी गल्ली तांबापुरा जळगाव) आणि रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (एमडीएस कॉलनी – रामेश्वर कॉलनी जळगाव) अशी स्थानबद्ध करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. रिजवान याच्याविरुद्ध जळगाव शहर, जिल्हापेठ, एमआयडीसी आदी पोलिस स्टेशनला दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत, सरकारी नोकरावर हल्ला, घरफोडी, चोरी, हद्दपार आदेशाचे उल्लंघन, शस्त्र अधिनियम असे एकूण 21 गुन्हे दाखल आहेत. रिजवान उर्फ काल्या याच्याविरुद्ध वेळोवेळी प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध वेळोवेळी दाखल गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयातून जामीनावर सुटून बाहेर आल्यानंतर देखील त्याच्या सराईत गुन्हेगारी कारवाया सुरुच होत्या. त्यामुळे जनतेच्या मनात असुरक्षेची भावना निर्माण झाली होती.

रितेश उर्फ चिच्या याच्याविरुद्ध धुळे शहर, जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर, जिल्हापेठ, एमआयडीसी आदी पोलिस स्टेशनला दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत, विनयभंग, धार्मिक भावना दुखावणे, सरकारी नोकरावर हल्ला, चोरी, चोरीचा उद्देश, मारामारी, शस्त्र अधिनियम, असे एकूण 16 गुन्हे दाखल आहेत. याशिवाय एक अडखलपात्र गुन्हा दाखल आहे. वेळोवेळी त्याच्याविरुद्ध प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सहायक पोलिस निरीक्षक मोरे, नीलेश गोसावी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार युनूस शेख इब्राहिम, हेड कॉन्स्टेबल सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक सचिन पाटील, योगेश बारी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. रिजवान याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात तर रितेश शिंदे याची अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment