पोलिसाला मारहाण करुन व्यक्त केला मनातील राग

On: March 30, 2023 11:46 AM

जळगाव : काही महिन्यांपुर्वी पोलिस स्टेशनला नेल्याचा राग मनात ठेवून एकाने हॉटेलमधे जेवणास आलेल्या पोलिस कर्मचा-याला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधीत तरुणासह त्याच्या इतर मित्रांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत पोलिसकर्मी आणि ज्या तरुणाला त्याने पोलिस स्टेशनला नेले होते तो तरुण असे दोघेही आपल्या मित्रांसोबत एकाच हॉटेलमधे जेवण करण्यास आले होते. त्या तरुणाची पोलिसावर नजर पडताच त्याच्या मनातील राग उफाळून आला.

जळगाव शहरातील नवीन बस स्थानक परिसरातील एका हॉटेलमधे हा प्रकार घडला. दारु पिऊन गोंधळ घालणा-या काही तरुणांना या घटनेतील पोलिसकर्मीने काही महिन्यापूर्वी पोलिस स्टेशनला नेले होते. तो राग तरुणाने मनात ठेवला होता. मंगळवारच्या रात्री दोघे एकाच ठिकाणी समोर येताच तरुणाने खिशातून फायटर काढून पोलिसाला मारहाण केली. यात पोलिस गंभीर जखमी झाला. चौघांना अटक करण्यात आली असून पोलिस उप निरीक्षक शांताराम देशमुख पुढील तपास करत आहेत.    

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment