अनोळखी मयत इसमाची ओळख पटवण्याचे आवाहन

On: March 31, 2023 7:45 PM

जळगाव : कोणत्या तरी धावत्या रेल्वेच्या धडकेने रुळावर मरण पावलेल्या अवस्थेत मिळून आलेल्या अनोळखी इसमाची ओळख पटवण्याचे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. आज सकाळी साडे सात वाजेच्यापुर्वी अप रेल्वे लाईनवर अनोळखी इसमाचे शव आढळून आले आहे.

मयत अनोळखी इसमाचे वय अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस असून त्याच्या डोक्याला जबर मार लागला आहे. मयताचा रंग गोरा आणि चेहरा लांबट आहे. मयताची ओळख पटल्यास तपासी अंमलदार तथा सहायक फौजदार रामराव इंगळे (रेल्वे दुरक्षेत्र जळगाव) यांच्याशी  9923168539 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.     

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment