जळगाव दि. 1 प्रतिनिधी – यावल तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी सुवर्णकार समाजातील ज्येष्ठ समाजसेवक श्री.डिगंबर रामदास शेठ मोरे- सोनार (वय 81) यांचे आज दि. 1 रोजी संध्याकाळी 6.15 वाजता वृध्दापकाळाने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.2 एप्रिल ला सकाळी 10.30 वाजता चिंचोली ता.यावल येथे निघेल. ते यावल, साने गुरूजी विद्यालयाचे प्रा. दिनेश डिगंबर शेठ मोरे, डॉ. विलास मोरे, डाॕ. प्रविण मोरे, इंजि. मिलींद मोरे, विपुल मोरे यांचे वडिल होत. त्यांच्या पश्चात सर्व बंधु, नातवंडे, सुना, नातसुना असा परिवार आहे.