जळगाव : चारित्र्याच्या संशय घेत पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक या गावी उघडकीस आली आहे. दरम्यान या घटनेने धरणगाव तालुक्यासह परिसरत खळबळ माजली आहे. मिराबाई संतोष भिल असे मयत विवाहीतेचे तर संतोष आखाडू भिल असे संशयीत मारेकरी पतीचे नाव आहे.
या घटनेतील संशयीत आरोपी पती संतोष भिल हा पत्नी मिराबाई पासून गेल्या दोन वर्षापासून वेगळा रहात होता. 3 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संतोष भिल याने त्याची पत्नी मिराबाई झोपली असतांना तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळून मारले. संशयीत आरोपी संतोष याचा मुलगा शिवदास संतोष भिल याने दिलेल्या फिर्यादीनुसार धरणगाव पोलिस स्टेशनला संतोष भिल याच्याविरुद्ध खूनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील संशयीत आरोपी पती जखमी झाल्याने त्याच्यावर सामान्य रुग्णालय जळगाव येथे वैद्यकीय उपचार सुरु आहेत.