जळगाव : भुसावळ येथील एका गृहीणीचा जामनेर येथील तरुणाने प्रिये, डियर, बायको असे व्हाटस अॅप स्टेटसवर संबोधून विनयभंग केल्याचे उघडकीस आले आहे. याशिवाय त्याने तिचा चोरुन लपून पाठलाग केल्याचे विवाहीतेच्या लक्षात आले. या प्रकाराला भुसावळ येथील गृहीणी वैतागली होती. विजय वंजारी असे जामनेर येथील विनयभंगाचा आरोप असलेल्या त्या तरुणाचे नाव आहे.
विजय वंजारी याने त्या महिलेच्या व्हाटस अॅप क्रमांकासह फेसबुक अकाऊंट लिंकच्या माध्यमातून वेळोवेळी तिच्या फोटोचे स्टेटस ठेवले. तिला प्रिये, डियर आणि बायको असे संबोधल्याने तिच्या मनात लज्जा निर्माण झाली. त्याच्या या प्रकारामुळे विवाहितेने भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला विजय वंजारी याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक भुषण जैतकर करत आहेत.