जळगाव : रस्त्याने जात असलेल्या विवाहीतेची वाट अडवून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली चौघांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिमसिंग हरिसिंग राजपूत, प्रदीप सुभाष बागुल, कमलाकर सुभाष बागुल, लकी भिमसिंग राजपूत (सर्व रा. महादेवाचे बामरुड ता. पाचोरा) अशा चौघांविरुद्ध विनयभंगाच्या आरोपाखाली पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग 5 गु.र.न. 100/23 भा.द.वि. 354 (ड), 341, 506 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील पिडीत फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ती रस्त्याने जात असतांना चौघांकडून तिची वाट अडवण्यात आली. भिमसिंग राजपूत तिला म्हणाला की तुझा नवरा तुला वागवत नाही मी तुला वागवून घेईन. त्याच्या अशा बोलण्यामुळे महिलेच्या मनात लज्जा निर्माण झाली. याशिवाय चौघे तिच्या मागे मागे येत असतांना वेगवेगळे विचित्र आवाज काढत होते. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक अशोक हटकर करत आहेत.