गाल ओढून तरुणीचा विनयभंग

जळगाव : तरुणीचे गाल ओढून एका मुलाने विनयभंग केल्याचा प्रकार जळगाव शहरातील नवी पेठ परिसरात 5 एप्रिल रोजी दुपारी घडला. या घटने प्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की या परिसरातील एका व्यापारी संकुलात एक तरुणी कामाला असून याच परिसरात एक मुलगा देखील कामाला आहे. त्या मुलाने अचानक मागून येत समोरुन तरुणीचे गाल ओढण्याचा प्रकार केला. अनपेक्षीतपणे घडलेल्या या प्रकाराने बेसावध तरुणी तोल जावून खाली पडली. स्वत: ला सावरत तरुणी जागेवरुन उठत असतांना त्या मुलाने तिचा हात धरुन पुन्हा तिचा विनयभंग केला.

या घटने प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव शहर पोलिस स्टेशनला गु.र.न. 92/23 भा.द.वि. 354 अ, अनुसुचीत जाती व जमाती अत्याचर अधिनियम दुरुस्ती  कायदा 2015 चे कलम 3(1) डब्ल्यु, 3(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप अधिक्षक संदीप गावीत करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here