जळगाव : तु मला आवडते, मला तुझी सवय झाली आहे, तुच माझे प्रेम आहे असे म्हणत विश्वास संपादन करुन विवाहीतेवर वेळोवेळी शरीरसंबंध निर्माण करणा-या चाळीसगाव येथील इसमविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या सन 1998 पासून वेळोवेळी हा प्रकार सुरु होता असे फिर्यादी पिडीतेचे म्हणणे आहे. निरंजन अशोक लद्दे असे गुन्हा दाखल झालेल्या चाळीसगाव येथील मिल गेट परिसरातील इसमाचे नाव आहे.
मला माझ्या पत्नीपासून सुख मिळत नाही, मला माझी पत्नी आवडत नाही, माझे तुझ्यावरच प्रेम आहे अशा भुलथापा विवाहितेला गेल्या सन 1998 पासून देण्याचे काम निरंजन करत होता. त्याच्यापासून ती गरोदर राहिली होती. चाळीसगाव येथील एका खासगी दवाखान्यात त्याने तिचा गर्भपात घडवून आणला होता. चाळीसगाव येथील एका ब्युटी पॉर्लर मधे, त्याच्या घरी, शेतात आणि पिडीतेच्या सासरी नाशिक येथे वेळोवेळी तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापीत केले. विवाहीतेला आर्थिक अडचण दाखवून तिच्याकडून निरंजन लद्दे याने वेळोवेळी सोन्याची चेन, अंगठी आणि एकुण चार लाख रुपये देखील घेतले असल्याचे पिडीत महिलेचे म्हणणे आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस करत आहेत.