जळगाव : मोबाईलमधे सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याच्या प्रियकराकडून वारंवार मिळणा-या धमकीला वैतागून सतरा वर्षाच्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जामनेर तालुक्यात उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी मुलीच्या आईने पहुर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार जामनेर तालुक्यातील लाखोली येथील एकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
29 मार्च रोजी घडलेल्या या घटनेनंतर दुखा:तून सावरल्यानंतर मुलीच्या वडीलांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तु माझ्यासोबत एकत्र रहा नाहीतर मी आपले मोबाईलमधे काढलेले फोटो व्हायरल करुन तुझी बदनामी करेन अशी त्या मुलाकडून आत्महत्या करणा-या मुलीला नेहमी मिळत होती. अखेर बदनामीच्या भितीपोटी तिने गळफास घेत आत्महत्या केली होती. गु.र.न. 100/23 भा.द.वि. 306, 506 नुसार दाखल या घटनेचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक संजय बनसोड करत आहेत.