जळगाव : पान मसाला गुटखा प्रतिबंधीत अन्न पदार्थ व हुक्का पॉर्लर साहित्याची विक्री करणा-या भुसावळ येथील दुकानावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज विविध ठिकाणी छापे टाकले. या छापा कारवाईत एकुण 4 लाख 51 हजार 824 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वसंत टॉकीजनजीक असलेले गायत्री पान मंदीर येथून पान गुटखा मसाला विक्री करणारे प्रकाश परमानंद जोशी, प्रदीप परमानंद जोशी (दोघे रा. प्रभाकर कॉलनी भुसावळ) यांच्या ताब्यातून, दुकानातून व राहत्या घरातून चोरटी विक्री करण्यासाठी साठवून ठेवलेला 4 लाख 30 हजार 475 रुपये किमतीचा प्रतिबंधीत पान मसाला, हुक्का पॉर्लर साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय सरदार वल्लभभाई पटेल मार्केट मधील गायत्री पान सेंटर येथे देखील छापा टाकण्यात आला. येथील पान दुकानदार पियुष प्रदीप जोशी (रा. प्रभाकर कॉलनी भुसावळ) यांच्या ताब्यातून 21 हजार 349 रुपये किमतीचा पान मसाला जप्त करण्यात आला आहे. एकुण 4 लाख 51 हजार 824 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भुसवळ शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो.नि. गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक संजय कंखरे व दिलीप चौधरी करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे, सहायक फौजदार युनुस शेख, हे.कॉ. सुनिल दामोदरे, दिपक पाटील, पोलिस नाईक रणजीत जाधव, पो.कॉ. किशोर राठोड, श्रीकृष्ण देशमुख, पोलिस नाईक किरण भावसार, प्रमोद लाडवंजारी, चालक प्रमोद ठाकुर, अमोल करडईकर, याशिवाय भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.