घरफोडीच्या उद्देशाने फिरणा-या तिघांची कारागृहात रवानगी

जळगाव : एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील मेहरुण तलाव परिसरात घरफोडीच्या उद्देशाने रात्री एकत्रीतपणे फिरणा-या तिघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले होते. विशाल मुरलीधर दाभाडे रा. आदित्य हॉटेल चौक, दिपक शांताराम रेणूके रा. गोकुळ नगर तांबापुरा आणि गुरुजीतसिंग सुजनसिंग बावरी रा. शिरसोली नाका तांबापुरा जळगाव अशी त्यांची नावे आहेत.

संशयास्पद स्थितीत फिरतांना आढळून आलेल्या तिघांच्या ताब्यातून सुरा व स्क्रु ड्रायव्हर असे साहित्य मिळून आले होते. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक निलेश गोसावी, पोलिस नाईक इमरान सैय्यद, मंदार पाटील, चेतन सोनवणे, सचिन पाटील, साईनाथ मुंडे, संदीप धनगर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांची कारागृहात रवानगीचे आदेश दिले. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. अटकेतील विशाल दाभाडे हा दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आला होता. तसेच त्याच्याविरुद्ध सात गुन्हे दाखल आहेत. गुरुजीतसिंग बावरी याच्याविरुद्ध दहा गुन्हे दाखल आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here