दिवसा घरफोडी करणा-यास अटक

On: April 13, 2023 7:30 PM

जळगाव : दिवसा घरफोडी करणा-या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मोहम्मद नदीम मोहम्मद रफीक असे (रा. बुरहानपूर मध्य प्रदेश) अटक करण्यातआलेल्या आरोपीचे नाव आहे. 2750 रुपये रोख आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा ऐवज त्याच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आला आहे.

जळगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून त्याला पुढील कारवाईकामी जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक गणेश चौबे, हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, विजय पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, सचिन महाजन, किरण चौधरी, भगवान पाटील, नंदलाल पाटील, संदीप सावळे, नितीन बाविस्कर इश्वर पाटील आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment