गोहत्या करुन मांसविक्री करणा-यास अटक

On: April 13, 2023 9:31 PM

जळगाव : गोवंशाची हत्या करुन मांसविक्री करणा-या आरोपीस एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. मुक्तार जमाल शेख असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या कब्जातून मांस कापण्याचा सुरा, कु-हाड व मांसाचे तुकडे व हाडे जप्त करण्यात आले आहे. या घटनेतून गोवंशाची तस्करी आणि विक्री उघडकीस आली आहे.

एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या फातेमा नगरात हा प्रकार एका सुज्ञ नागरीकाच्या मदतीने उघडकीस आला आहे. पो.नि. जयपाल हिरे यांच्या पथकातील स.पो.नि. अमोल मोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक हेमंत कळसकर, पो.कॉ. चंद्रकांत पाटील, वाहनचालक सहायक फौजदार रविंद्र चौधरी, होमगार्ड विजय कोळी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.  पो.कॉ. राहुल रगडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment