मोबाईलमधील फोटोचा धाक दाखवून विवाहीतेचा विनयभंग

जळगाव : मोबाईलमधे काढलेले फोटो पतीला दाखवण्याची धमकी देत विवाहीतेचा विनयभंग करणा-या तरुणाविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास अशोक तायडे असे गुन्हा दाखल झालेल्या भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथील तरुणाचे नाव आहे.

या घटनेतील कैलास तायडे याने विवाहीतेकडून वेळोवेळी काही रक्कम उधार घेतली होती. दरम्यानच्या कालावधीत त्याने आपल्या मोबाईलमधे तिचे फोटो काढले होते. विवाहीतेने आपल्याला वेळोवेळी उधार दिलेली रक्कम पुन्हा मागू नये यासाठी त्याने मोबाईलमधे काढलेल्या फोटोचा आधार घेतला असे विवाहीतेचे म्हणणे आहे. ते फोटो आपल्या पतीला दाखवण्याची धमकी कैलासने दिली असा विवाहीतेचा कैलासवर आरोप आहे. गेल्या अडीच महिन्यापासून दोघांमधे परिचय झाला.  

कैलासने संबंधीत विवाहीतेला फोन करुन घरात बोलावून बंद दाराआड तसेच रस्ता अडवून काढलेले फोटो मोबाईल व्हाटस अ‍ॅप स्टेटसला ठेवले. त्यामुळे बदनामी झाल्यासह विविध आरोपाखाली भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग 5 गु.र.न. 55/23 भा.द.वि. 354, 354(ड), 341, 500, 506 नुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ. संजय भोई करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here