तिघांच्या संबंधातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

On: April 17, 2023 9:57 AM

जळगाव : तिघा तरुणांच्या संबंधातून अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याची घटना पारोळा तालुक्यात उघडकीस आली असून या घटनेने खळबळ माजली आहे. या घटनेतील तिघा संशयीत आरोपी तरुणांना अटक करण्यात आली आहे. बारकु उर्फ प्रविण बाळू पाटील, पप्पु उर्फ शुभम बापू पाटील (दोघे रा. सावखेडा तुर्क ता. पारोळा) आणि भावश्या उर्फ भाऊसाहेब वसंत पाटील रा. सावखेडा होळ ता. पारोळा अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. गेल्या सहा ते सात महिन्यापुर्वीपासून हा अत्याचाराचा प्रकार सुरु होता.

या घटनेतील पिडीत मुलगी ज्या शेतात कामाला जात होती त्याच शेतात तिघे तरुण देखील कामाला जात होते. कधी एकाने तर कधी दोघांनी मिळून पिडीत मुलीसोबत शरीर संबंध प्रस्थापीत केले. हा प्रकार कुणाला सांगीतला तर आम्ही तुझ्यासोबत तयार केलेला व्हीडीओ सर्वांना दाखवून तुझी बदनामी करु अशी धमकी देत तिघे तिच्यावर अत्याचार करत होते. त्यातून ती सोळा आठवड्याची गर्भवती झाल्याचे वैद्यकीय तपासणीअंती उघड झाले. तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. गु.र.न. 118/23 भा.द.वि. 354, 376, 501, 34 तसेच अ‍ॅट्रॉसीटी आणि पोस्को कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास उप विभागीय अधिकारी राकेश जाधव करत आहेत.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment