मुंबई : राज्य सरकारने आंतरराज्य एसटी सेवा सुरु करण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे. उद्या 20 ऑगस्टपासून बससेवा सुरु होणार आहे.ज्यावेळी खचाखच प्रवासी भरुन एसटी धावत होती त्यावेळी ‘एसटी’ला प्रती किलोमीटर दहा रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता.
त्यानंतर कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाल्यानंतर निम्म्या प्रवाशांना घेवून प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली होती. त्यामुळे एस.टी. अर्थात लालपरीचा खर्च निघणे कठिण झाले होते. त्यामुळे आंतर जिल्हा वाहतूकीचे मोठे आव्हान लालपरीपुढे होते.पूर्ण लॉकडाऊन काळात लालपरीला दिवसाला बावीस कोटी रुपयांचा तोटा झाला. आंतरजिल्हा बससेवा सुरु करण्याची मागणीही प्रवासी वर्गातून सुरु होती. ती आता मान्य झाली आहे.