नवी दिल्ली : केंद्र सरकारने आजच्या कॅबिनेट बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या बैठकीत राष्ट्रीय भरती एजन्सी (NRA)ला मान्यता देण्यात आली आहे. याबाबतची माहिती मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. तरुणांना नोकरी मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या परीक्षांच्या दिव्यातून जावे लागत होते. आता फक्त एकच परीक्षा द्यावी लागेल.
देशात विस प्रकारच्या भरती एजन्सी आहेत. प्रत्येक एजन्सीच्या परीक्षा देण्यासाठी विविध ठिकाणी परिक्षार्थी विद्यार्थ्यांना जावे लागत होते. आता राष्ट्रीय भरती एजन्सी (नॅशनल रिक्रूटमेंट एजेन्सी) परिक्षार्थिंची सामान्य पात्रता परीक्षा घेईल. याबाबतची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून तरुणांकडून सुरु होती. ही मागणी पुर्ण झाल्यामुळे परिक्षार्थींचे पैसे व वेळेची बचत होणार आहे.