ऑनलाईन साडी बुक करणा-या तरुणीच्या खात्यातून लाखाची रक्कम गायब

जळगाव : ऑनलाईन मागवलेली साडी अद्याप का मिळाली नाही म्हणून तपास करण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर तपास करण्यासह आपल्या क्रेडीट कार्डचा क्रमांक देणे तरुणीला महागात पडले आहे. या तरुणीच्या बॅंक खात्यातून आठ मेसेजच्या माध्यमातून एकुण 1 लाख 24 हजार 754 रुपये वळते झाले आहे.

एमबीएचे शिक्षण झालेली जळगाव शहरात राहणारी तरुणी सध्या स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे. या तरुणीने ऑनलाईन साडी बुक केली होती. मात्र ती साडी अद्याप का आली नाही म्हणून संबंधीत कुरियर कंपनीच्या वेबसाईटवर जावून टोल फ्री क्रमांक मिळवला. त्या टोल फ्री क्रमांकावर फोन लावला असता पत्ता सापडत नसल्याम्ळे डिलीव्हरी पेंडीग असल्याचे सांगण्यात आले. कंपनीच्या वेबसाईटवर जावून लिंकच्या माध्यमातून माहिती भरुन देण्याचे तरुणीला पलीकडून बोलणा-याने सांगितले. तरुणीने सर्व माहिती भरुन देत असतांनाच बॅंकेच्या क्रेडीट कार्डचीदेखील माहिती आणी क्रमांक जाहीर केला आणि ईथेच तिची फसगत झाली. तिच्या खात्यातून एकुण 1 लाख 24 हजार 754 रुपये परस्पर वर्ग झाल्याचे दिसून आले. तरुणीने बॅंकेत जावून तक्रार केली. मात्र तरुणीच्या म्हणण्यानुसार बॅंकेने तातडीने कारवाई केली नाही. अखेर एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठून रितसर फिर्याद दाखल करण्यातआली. पुढील तपास सुरु आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here