जळगाव गोळीबार घटनेतील दोघांना अटक

जळगाव : जळगाव नजीक आसोदा येथील गोळीबार घटनेतील दोघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. धरणगाव तालुक्यातील वाकटूकी शेत शिवारातून दोघांना अटक करण्यात आली आहे. चेतन उर्फ चिंग्या सुरेश आळंदे (रा. तुकारामवाडी जळगाव) आणि केयुर कैलास पंदाने (रा. शिवाजी नगर जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. योगेश दिगंबर कोल्हे (रा. आसोदा -जळगाव) याने दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

21 एप्रिल 2023 रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास योगेश कोल्हे हा आसोदा येथील हॉटेल आर्यच्या आवारात बसलेला असतांना त्याला बंदुकीच्या दोन गोळ्या झाडल्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने योगेश कोल्हे याने धाव घेतली असता त्याला मोटार सायकलवर चेतन आळंदे आणी केयुर पंदाने हे दोघे दिसले. केयुर हा मोटार सायकल चालवत होता तसेच चेतन हा मागे डबलसिट बसलेला होता.  योगेश दिसताच मोटार सायकल थांबवून केयुर त्याच्याजवळ आला. केयुरने त्याला पकडून ठेवत चिंग्याला गोळ्याघालण्याची चिथावणी दिली. चेतन याने योगेशच्या दिशेने झाडलेली गोळी योगेश शिताफीने चुकवण्यात यशस्वी झाला. कानाला चाटून बंदुकीची गोळी गेल्याने आणी नशिबाने प्राण वाचलेल्या योगेशने केयुरच्या हाताला जोरदार धक्का देत पलायन केले.   

चेतन ऊर्फ चिंग्या हा गुन्हेगारी पार्श्वभुमीचा असून न्यायालयाने त्याला जळगाव शहर आणी जळगाव तालुका बंदी केली आहे. तरी देखील तो रात्री अपरात्री बंदी घातलेल्या भागात येवून चेतन उर्फ चिंग्या हा दहशत माजवत असल्याचे उघड झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक गणेश चौबे, हे.कॉ. विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, विजय पाटील, नितीन बविस्कर, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, चालक दर्शन ढाकणे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here