हद्दपार आरोपीच्या ताब्यातून सुरा जप्त

On: April 23, 2023 8:23 AM

जळगाव : दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीच्या ताब्यातून लोखंडी सुरा जप्त करण्यात आला आहे. जुनेद उर्फ बवाली युनूस शेख (रा. तांबापुरा जळगाव) असे पोलिसांनी ताब्यात घेत अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

दिनांक 22 एप्रिल रोजी जळगावच्या मेहरुण परिसरात बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान या परिसरात जुनेद उर्फ बवाली युनूस शेख हा आपल्या कब्जात सुरा बाळगून दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करत कारवाईच्या सूचना दिल्या.

पो.नि. जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हेमंत कळसकर, किशोर पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, विशाल कोळी, राहुल रगडे आदींनी जुनेद यास ताब्यात घेतले. त्याच्या कब्जातून लोखंडी सुरा हस्तगत करण्यात आला. जुनेद उर्फ बवाली युनूस शेख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले असतांना तो जळगाव शहरात वावरत होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment