जळगाव : कुलूप लावलेल्या बंद घराचा कडीकोंडा तोडून घरफोडी करणा-या दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासोबत गुन्हा करणा-या अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. मोहसीन खान नूर खान (रा. गेंदालाल मिल, जळगाव) आणि ईस्माईल उर्फ राजु शेख शब्बीर (रा. साहील किराणा मागे, गणेशपुरी, मास्टर कॉलनी, मेहरुण – जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
दिनांक 20 एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास सुप्रीम कॉलनी भागातील मन्नत बंगला परिसरातील रहिवासी मोहम्मद अवेस अब्दुल सत्तार हा तरुण घराला कुलूप लावून नातेवाईकाकडे गेला होता. त्यावेळी घर बंद असल्याचे बघून चोरट्यांनी कुलुप तोडून घरात प्रवेश करुन लोखंडी कपाटाच्या तिजोरीतील 1 लाख 92 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेला होता. या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वून आमच्या घरात घरफोडी केली होती. सदर बाबतीत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दिनांक 21/04/2023 रोजी एम.आय.डी.सी. पो.स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहसीन खान नूर खान याने केल्याची माहिती तपासाअंती पो.नि. जयपाल हिरे यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे स.फौ. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. गणेश शिरसाळे, पो.ना. इम्रान सैय्यद, सुधीर सावळे, सचिन पाटील, योगेश बारी, मुदस्सर काझी, साईनाथ मुंढे आदींनी त्याला चौकशी कामी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल करत त्याचा साथीदार ईस्माईल उर्फ राजु शेख शब्बीर याचे नाव सांगितले. याशिवाय या गुन्ह्यात एका अल्पवयीन साथीदाराचा देखील सहभाग असल्याचे कबुल केले.
त्यानुसार इस्माईल उर्फ राजू आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. मोहसीन खान आणि इस्माईल उर्फ राजू शेख शब्बीर या दोघांना अटक करण्यात आली. याशिवाय अल्पवयीन बालकाला ताब्यात घेण्यात आले. अटकेतील दोघांच्या ताब्यातून 95 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटकेतील दोघांना न्या. जे. एस. केळकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना 26 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहीले. अटकेतील दोघांकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.