पुजारी महिलेस मंदिरातच गंडवले दोन लाखात

On: April 25, 2023 12:06 PM

जळगाव : तुमच्या अंगावरील दागिने देवीच्या पायाला लावा, तुमच्या परिवाराचे भले होईल असे सांगून चक्क महिला पुजा-याची मंदीरातच फसवणूक झाल्याची घटना वरणगाव येथील रेणूका माता मंदिरात घडली. या घटनेप्रकरणी महिला वृद्ध पुजारी श्रीमती शालिनी रघुनाथ जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरणगाव पोलिस स्टेशनला अज्ञात इसमाविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीमती शालिनी जोशी या पुजारी म्हणून वरणगाव येथील रेणुकामाता मंदीरात काम बघतात. अज्ञात इसमाने त्यांना पाचशे रुपये दक्षिणा दिली. दक्षिणा दिल्यानंतर गोड बोलून त्यांना आलेल्या अज्ञात इसमाने विश्वासात घेतले. तुमच्या अंगावरील दागिने तुम्ही देवीच्या पायाला लावा, तुमच्या परिवाराचे भले होईल असे सांगितले. हात चलाखीने आलेल्या अज्ञात इसमाने श्रीमती जोशी यांचे दोन लाख रुपये किमतीचे दागिने घेत फसवणूक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक परशुराम दळवी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment