जळगाव : बिरुदेव व्हडगर लिखीत कठाळ या काव्य संग्रहाचे प्रकाशन नुकतेच जळगाव येथील व. वा. वाचनालयात संपन्न झाले. यावेळी अध्यक्ष स्थानी क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु व्ही.एल. माहेश्वरी तर प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण येथील प्रसिध्द कवी जितेंद्र भामरे आदी उपस्थित होते. कवी व लेखकांच्या हातून समाज उपयोगी लिखान झाले पाहिजे, आणि तो प्रयत्न बिरूदेव व्हडगर यांना आपल्या कवितेतून केला असल्याचे मत कुलगुरू माहेश्वरी यांनी यावेळी व्यक्त केले.
व्हडगरांची कविता ही पिडीत व वंचित मेंढपाळ समाजाची व्यथा मांडणारी असल्याचे मत कवी भामरे यांनी तर सत्ता उलथवून ठाकण्याचे सामर्थ्य कवी आणि लेखकांमध्ये असल्याचे मत अशोक कोतवाल यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला खान्देशातील जेष्ठ कवी भगवान भटकर, मिलींद बागुल, प्रफुल्ल पाटील यांच्यासह जिल्ह्यांतील कवी व लेखक उपस्थित होते. ज्येष्ठ साहिायीक डॉ. बापूूराव देसाई होते. सुत्रसंचालन रफीकोद्दीन काझी यांनी केले. अनुष्का सेवाभावी संस्थेच्या वैशाली व्हडगर, अंबादास व्हडगर, प्रकाश पाटील, भरत पालोदकर, संदीप नेवे, निवृत्ती भालेराव, सुनिल भटकर, विजय महानुभव, नरेश तोलानी, दत्तू घुगे, वंदना कोळी, दिवेश पांढरे, मुकेश पाटील आदींनी परिश्रम घेतले.