लोखंडी चॉपरसह रेकॉर्डवरील गुन्हेगार ताब्यात

On: May 3, 2023 9:47 PM

जळगाव : एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या अभिलेख्यावरील गुन्हेगारास लोखंडी चॉपरसह ताब्यात घेण्यात आले आहे. शैलेश शंकर चौधरी (रा. सम्राट कॉलनी जळगाव) असे चॉपरसह ताब्यात घेण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

 एमआयडीसी हद्दीतील एचडी फायर कंपनीजवळ शैलेस चौधरी हा चॉपरसह वावरत असल्याची गोपनीय माहिती पो.नि. जयपाल हिरे यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिस उप निरीक्षक आनंदसिंग पाटील, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोना विकास सातदिवे, किशोर पाटील, इमरान सैय्यद, योगेश बारी, पोकॉ मुकेश पाटील, किरण पाटील, छगन तायडे आदींनी त्याला ताब्यात घेत पुढील कारवाई केली आहे.

त्याच्याविरुद्ध आर्म अॅक्ट कलम 4/25 तसेच मुंबई पोलिस अधिनियम कलम 37[1][3]चे उल्लंघन 135 प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शैलेश शंकर चौधरी यांच्याविरुद्ध यापुर्वी जिवे ठार मारण्याच्या प्रयत्न करण्याबाबतचा गुन्हा एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment