अल्पवयीन मुलीस गर्भवती करणा-याविरुद्ध गुन्हा

On: May 4, 2023 8:04 AM

जळगाव : अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध ठेवून तिला चार महिन्यांची गर्भवती करणा-या बावीस वर्षाच्या तरुणाविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला बलात्कार, पोस्को सह इतर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान मुख्तार सैय्यद असे सातारा इमाम वाडा भुसावळ येथील राहणा-या गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

चार महिन्यापुर्वी मामाच्या घराबाहेर उभा राहून इमरान याने पिडीत मुलीला इशारा करुन बोलावले होते. मामाच्या घरात कुणी नसतांना त्याने पिडीत मुलीला घरात नेवून ती अल्पवयीन असतांना देखील तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्यासोबत शरीरसंबंध निर्माण केल्याने ती गर्भवती झाली. शरीरसंबंध केल्यानंतर इमरान याने पिडीत मुलीसोबत सेल्फी काढून तो इन्स्टाग्रामवर स्टोरीच्या स्वरुपात ठेवला.

गर्भवती अल्पवयीन पिडीतेने भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार इमरान याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 83/23 भा.द.वि. 376, 376 (3), 354 (अ), (1) (आय) सह लैंगिक अत्याचारापासूनबालकांचे सरंक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 8, 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे करत आहेत.      

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment