अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याप्रकरणी तिन गुन्हे दाखल

On: May 4, 2023 8:44 AM

जळगाव : अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यात तिन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रावेर तालुक्यातील निंभोरा, पारोळा आणि चोपडा शहर पोलिस स्टेशनला हे तिन गुन्हे दाखल झाले आहेत.

निंभोरा येथील दाखल गुन्ह्यात अमोल अशोक मोरे (रा. निंभोरा ता. रावेर) या संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उप निरीक्षक राजेंद्र काशिनाथ पाटील करत आहेत. पारोळा पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात शंकर किशोर भिल (रा. पिंपळकोठा ता. पारोळा) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ. किशोर रामदास पाटील करत आहेत. चोपडा शहर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात संशयीत आरोपी अज्ञात आहे. यआ गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक घनश्याम तांबे करत आहेत.       

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment