घरफोडीच्या उद्देशाने फिरणारे चौघे ताब्यात

On: May 7, 2023 10:57 PM

जळगाव : स्वत:चे अस्तित्व लपवून चोरी, घरफोडी करण्याच्या उद्देशाने वावरणा-या चौघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघे असे एकुण चौघे जण ताब्यात घेण्यात आले आहेत.

आज भल्या पहाटे दोन वाजेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात हद्दपार आरोपी सोनुसिंग रमेश राठोड (रा. रामदेव बाबा किराणा दुकानाजवळ, सुप्रीम कॉलनी, जळगाव) हा त्याचा साथीदार प्रशांत उर्फ चोरबाप्या पुंडलीक साबळे (रा. गजानन महाराज मंदिराजवळ, सुप्रीम कॉलनी, जळगाव) याच्यासह पोलिस पथकाला मिळून आला.

दुस-या घटनेत भल्या पहाटे एक वाजेच्या सुमारास अयोध्या नगर परिसरात हनुमान मंदीरालगत समीर शेख फिरोज शेख (रा. फातेमा नगर, जळगाव) आणि समीर खान अफसर खान (रा. शेरा चौक, मेहरुण, जळगाव) हे दोघे जण आपले अस्तित्व लपवून फिरत असतांना मिळून आले.

चौघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 122 (ब) (क) सह 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक आनंदसिंग पाटील, पो.ना. विकास सातदिवे, पो.ना. मुदस्सर काझी, पो.कॉ. ललीत नारखेडे, पो.कॉ. किरण पाटील, पो. कॉ. सतिष गर्जे यांनी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment