जळगाव : विनयभंगाच्या तक्रारींनी व्यथीत झाल्याने कंटाळून आत्महत्या करणा-या इसमाच्या मुलाने आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली दोघांविरुद्ध यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. प्रमोद रघुनाथ डोंगरे आणि सुजाता रघुनाथ डोंगरे (दोघे रा. वड्री ता. यावल) अशी दोघा संशयीत आरोपींची नावे आहेत.
नामदेव दगडू खैरनार (रा. वड्री ता. यावल) यांनी 8 मे 2023 रोजी दुपारीतिन वाजेच्या सुमारास डोंगरकठोरा ता. यावल येथील आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचारी निवासस्थानात आत्महत्या केली होती. नामदेव खैरनार आणि त्यांचा मुलगा अशा दोघांविरुद्ध विनयभंगाच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या तक्रारी खोट्या होत्या आणी त्यामुळे नामदेव खैरनार यांची समाजात प्रतिमा मलीन झाली असा योगराज खैरनार यांचा आरोप आहे.
या तक्रारींमुळे योगराज खैरनार यांचे वडील नामदेव खैरनार हे मोठ्या प्रमाणात व्यथीत झाले आणि कंटाळून त्यांनी आत्महत्या केली या आशयाखाली यावल पोलिस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सुनिल मोरे करत आहेत.