रुग्णाच्या नातेवाईकांची महिला डॉक्टरांना मारहाण

On: August 20, 2020 6:31 PM

औरंगाबाद : कोरोनाच्या संकटातून रुग्णांना बाहेर काढण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत असतांना डॉक्टरांनाच मारहाण करण्याचे प्रकार देखील घडत आहेत. असाच एक प्रकार औरंगाबाद येथे एमजीएम रुग्णालयात बुधवारी रात्री घडला. या घटनेत दगावलेल्या रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी महिला डॉक्टरांनाच मारहाण केल्याचा निंदनीय प्रकार समोर आला.

औरंगाबाद शहराच्या महात्मा गांधी मिशन, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हा प्रकार घडला. या रुग्णालयात कोरोना बाधीत रुग्णावर उपचार सुरु असतांना त्या रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समजताच संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनास जाब विचारला. मात्र नातेवाईकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे चिडलेल्या नातेवाईकांनी थेट कोरोनाबाधीत कक्षात जावून महिला डॉक्टरांनाच मारहाण सुरु केली. तसेच कक्षातील सामानाची देखील नासधूस केली. या प्रकरणी सिडको पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment