जळगाव : रात्री उशीरापर्यंत मोठ्या आवाजात स्पिकर सुरु असल्यामुळे कारवाई करण्याकामी आलेल्या पोलिस कर्मचा-याची कॉलर पकडून चापटा बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाम नारायण गवळी उर्फ अण्णा गवळी, आणि टेम्पो वाहनावरील अज्ञात चालकासह एकुण चौघांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहरातील लोखंडवाला कॉम्पलेक्स समोर अभिनव शाळेसमोर 10 मे च्या रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटने प्रकरणी गु.र.न. 203/23 भा.द.वि. 353, 332, 504, 34 महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 38/136 नुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. सचिन कापडणीस करत आहेत.