लग्नापुर्वीचा व्हिडीओ झाला व्हायरल- लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल

On: August 20, 2020 8:12 PM

पुणे : जवळच्या नातेवाईकाने तरुणीस लग्नाचे अमिष दाखवून तिच्या मनाविरुद्ध शरीर संबंध प्रस्थापित केले. तिच्या सोबत केलेल्या शरीरसंबंधाची व्हिडीओ क्लिप तयार केल्यानंतर त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. व्हिडीओ क्लिपच्या आधारे धमकी देत त्याने तिच्यासोबत वेळोवेळी शरिरसंबंध ठेवले. त्यानंतर काही दिवसांनी त्या तरुणीचे लग्न झाले. लग्नानंतर दोन महिन्यांनी तिची ती व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली.

23 वर्षाच्या पिडीत तरुणीने लोणी काळभोर पोलिसात याप्रकरणी फिर्याद दाखल केली. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार सुरेश निवृत्ती धांदे (साडेसतरा नळी, हडपसर, पुणे) याच्या विरोधात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment