स्कुटीवर सोडून देण्याचा बहाणा – सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार

On: May 14, 2023 11:45 AM

जळगाव : स्कुटीवर घरी सोडून देण्याचा बहाणा करत सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत दुष्कृत्य केल्याचा प्रकार चाळीसगाव शहरात उघडकीस आला आहे. या घटने प्रकरणी पिडीत अल्पवयीन पिडीत बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश उर्फ सुपड्या विठ्ठल पाटील असे चाळीसगाव शहरातील संशयीत आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

सात वर्षाच्या बालिकेला स्टेशन रोड परिसरातून संशयीत आरोपीने स्कुटीवर बसवले. तुला घरी सोडून देतो असा बहाणा करत त्याने तिला न्यायालय परिसरातील टेनीस मैदान भिंतीच्या आडोशाला नेत तिच्यासोबत दुष्कृत्य केले. हा प्रकार पिडीत बालिकेने तिच्या आईला कथन केला. तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. विशाल टकले करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment