पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणास मारहाण – चौघांविरुद्ध गुन्हा

On: May 15, 2023 5:16 PM

जळगाव : तुझे माझ्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत. तु माझ्या पत्नीसोबत नेहमी मोबाईलवर का बोलतो? असे म्हणत घरात घुसून तरुणाला शिवीगाळ व मारहाण करण्याचा प्रकार यावल तालुक्यात घडला. या घटनेत तरुणास होत असलेली मारहाण बघून त्याचा बचाव करण्यासाठी त्याची आई आली. मात्र त्याच्या आईच्या अंगावरील वस्त्र फाडून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न झाला. या घटने प्रकरणी यावल पोलिस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील एका गावात घडलेल्या या घटनेत मारहाण झालेल्या तरुणाचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याचा संशय एकाला होता. त्याच्यासोबत तिघे जण तरुणाला मारहाण करण्यासाठी आले होते. मारहाण करणा-या मुख्य संशयीत आरोपीने तरुणाला मारण्यासाठी जवळच पडलेली लाकडी वस्तू उगारली. लाकडी वस्तूचा वार चुकवण्यासाठी तरुण खाली बसला. त्यामुळे लाकडी वस्तूचा वार दुस-याच तरुणावर झाला व त्यात तो जखमी झाला. या घटनेचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सुनिल मोरे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment