जळगाव दि. १५ प्रतिनिधी – जैन स्पोर्टस् अॅकडमीतर्फे १६ एप्रिल ते १४ मे दरम्यान ‘समर कॅम्प-२०२३’चे आयोजन करण्यात आले होते. त्याचा समारोप समारंभ विद्या इंग्लीश मिडीअम स्कूलच्यामागे असलेल्या क्रीडांगणावर झाला. यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा क्रीडा साहित्य व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे अधिक्षक व्ही. एन. तायडे, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, अनुभूती निवासी स्कूलचे प्राचार्य देबासिस दास, जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव नंदलाल गादिया, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे डॉ. अश्विन झाला, जैन इरिगेशनचे अनिल जोशी उपस्थित होते.
उन्हाळी प्रशिक्षणाचा आढावा मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल यांनी सांगितला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन वरूण देशपांडे यांनी केले. आभार अजित घारगे यांनी मानले. बॅडमेंटनचे सहप्रशिक्षक गीता पंडीत यांनी मनोगत व्यक्त केले. खेळाडूंना शुभेच्छा देताना नंदलाल गादिया यांनी जैन स्पोर्टस् अॅकडमीच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबीर हे शारिरीक, मानसिक आरोग्य सांभाळत पाल्यांचा सर्वांगिण विकास करणारे ठरले. यातूनच राज्य, राष्ट्रीयस्तरावरील खेळाडू आपला विकास करून शकतात. खेळ, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी श्री. अशोक जैन, श्री. अतुल जैन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याने त्यांचेही आभार नंदलाल गादिया यांनी मानले. डॉ. अश्विन झाला यांनी जैन स्पोर्टस् अॅकडमी विविध क्रीडा प्रकारांत हे खेळाडूंमध्ये आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि आरोग्यासंबधी जागृतता आणत असून यातूनच राष्ट्रनिर्माणाचे कार्य घडत आहे. अध्यक्षीय मनोगत प्राचार्य देबासिस दास यांनी व्यक्त केले. जळगावसारख्या शहरात श्री. अतुल जैन यांच्यासारख्या क्रीडाप्रेमीमुळे अनुभूती निवासी स्कूल येथे खेळासाठी आवश्यक असलेल्या उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यात. त्यामुळे खेळाकडे विद्यार्थी करिअरच्यादृष्टीने बघत असल्याचेही देबासिस दास म्हणाले.
जैन स्पोर्टस अॅकडमीतर्फे केवळ उन्हाळी शिबीरार्थींचा नव्हे तर विविध क्रीडाप्रकारांमध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक व खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यामध्ये निलम घोडगे, अभिजीत त्रिपणकर, वाल्मिक पाटील, कांचन चौधरी, अजित घारगे, पुष्पक महाजन, प्रविण ठाकरे, शुभम शर्मा, तनेश जैन, किशोरसिंग सिसोदिया, शशांक अत्तरदे, ओम मुंढे, शुभम पाटील, योगेश्वरी धोंगडे, मनिषा हटकर, क्रिष्णा हटकर, प्रणव भोई, निलेश पाटील, श्रेयांक खेकरे, सरीपट्टा घेटे, निकेतन खोडके, रोहन अवधूत, महिमा पाटील, शितील रूढे, निशा अवधूत, तेजस्वीनी श्रीखंडे, सायली कुलकर्णी, रिषभ कारवा, सिद्धेश देशमूख, नचिकेत ठाकूर, तुलजेस पाटील, तन्वीर अहमद, सोनल हटकर, साक्षी पाटील, गौरी साळूंखे, आयशा साजीद खान, मिताली पाठक, फरहीन खान, पुष्करणी भट्टड, वरूण देशपांडे, घनशाम चौधरी, राहुल निभोंरे, उदय सोनवणे, पंकज पवार, योगेश धोंगडे, अनिल मुंढे, रहिम खान, निलम अन्सारी, सय्यद मोहसीन यांचा समावेश होता. दरम्यान जैन स्पोर्टस् अॅकडमीचे अध्यक्ष अतुल जैन यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सर्वाच्च समितीत निवडून आल्याने त्यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
उन्हाळी प्रशिक्षण शिबीरामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजाविणाऱ्या सर्व खेळाडूंचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये बुद्धिबळसाठी सुजल चौधरी, श्लोक वारके, क्षितीज वारके, तायक्वांदोसाठी दानिश तडवी, निकिता पवार, पुष्कप महाजन, बास्केटबॉलसाठी प्रियांशू जाधवानी, चिन्मय सूर्यवंशी, विरेंद विसररानी, उमंग बेंडवाल, सोहम पाटील, पूर्वा हटकर, फुटबॉलसाठी निव जेलवाणी, हुझेर देशमुख, अर्थव राठोड, दुर्वेश देवरे, रशिद शेख, बॅडमेंटनसाठी आर्या गोला, शौनक माहेश्वरी, ईशांत साळी, पुनम ठाकूर, डॉ. हर्षदा पाटील, अमोघ बाविस्कर, श्रीनिवास पाटील, हर्द झाला, अद्विती पाटील, क्रिकेटसाठी श्रेयस नारजोगे, केतन जैन, आरव यादव, अनय चतुर्वेदी, शेख अब्दुला शेख जावेद, एकता दहाळ, दक्ष ओटोळे, गौरव ठाकूर यांचा समावेश होता. यात वेद पटेल हा सर्वात्कृष्ट शिबीरार्थी ठरला त्याला क्रिकेटचे संपूर्ण किट देऊन सन्मानित करण्यात आले. शिबीर यशस्वीतेसाठी श्री. अतुल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी, सुयश बुरकूल, मुश्ताक अली, वरूण देशपांडे, राहुल निभोंरे, घनशाम चौधरी, उदय सोनवणे यांनी सहकार्य केले.