बोलेरो पिकअप वाहन चोरट्यास अटक

On: May 16, 2023 11:02 PM

जळगाव : बोलेरो पिकअप वाहन चोरट्यास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. सलीम शेख कलीम (रा. नशिराबाद ता. जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. या चोरी प्रकरणी उमाळा ता. जळगाव येथील बोलेरो वाहन मालक शंकर प्रभाकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना समजलेल्या माहितीच्या आधारे हा गुन्हा सलीम शेख कलीम याने केल्याचे उघड झाले. पोलिस चौकशीत त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. त्याच्या विरुद्ध यापुर्वी वाहन चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ अतुल वंजारी, मुदस्सर काझी, ईम्रान सैय्यद, छगन तायडे, साईनाथ मुढे, राहुल रगडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आठ महिन्यांनी हा गुन्हा उघडकीस आला आहे. अशाच प्रकारचे इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment