‘सेल्फी’ ने घेतला युवकाचा जीव

On: August 20, 2020 10:06 PM

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील 18 वर्षाच्या युवकाचा सेल्फीने जीव घेतल्याची घटना आज घडली. रामशेज किल्ल्यावरुन सेल्फी घेण्याच्या नादात पाय घसरुन तलावात कोसळल्याने ही जीवघेणी घटना घडली आहे. रितेश समाधान पाटील असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. जानोरी येथील स्थानीक पत्रकार समाधान पाटील यांचा तो एकुलता चिरंजीव होता.

जानोरी येथील सहा मित्रांसोबत रितेश हा रामशेज किल्ल्यावर आज फिरण्यासाठी गेला होता. ऐतिहासीक किल्ल्याची पाहणी करत असतांना तो विविध फोटो मोबाईलमधे घेत होता. त्याचवेळी तलावाच्या काठी उभा राहून सेल्फी काढण्याच्या नादात त्याचा पाय घसरला. तळ्यात पाण्याचे प्रमाण कमी व दगड जास्त असल्याने मार लागून तो मृत्यूमुखी पडला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment