जळगाव : गावठी कट्टा, दोन जीवंत काडतूस बाळगणा-या आणि विक्री करणा-या अशा तिघांना भुसावळ उप विभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने भुसावळ शहरातून अटक केली आहे. ललीत तुलसीदास खरारे याच्याकडून गावठी कट्टा आणि जितेन आनंद बोयत याच्याकडून दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. गावठी कट्टाआणि जीवंत काडतूस या दोघांना विक्री करणारा पवन किसन खरारे याला देखील अटक करण्यात आली आहे. तिघे जण भुसावळ शहरातील वाल्मिक नगर भागातील रहिवासी आहेत. या तिघांकडून दोन मोबाईल आणी मोटार सायकल हा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे.
भुसावळ उप विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील पो.हे. कॉ. सुरज पाटील, पो.हे.कॉ. रमण सुरळकर, पो.ना. यासीन पिंजारी, पो.ना. संकेत झांबरे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गु.र.न. 205/2023 आर्म अॅक्ट कलम 3/25, 5/25 भादवी कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.